Psalms 35:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांची निराशा करुन त्यांना शरम वाटेल असे कर. त्यांना पाठ फिरवून पळून जायला लावते लोक मला दुख द्यायच्या योजना आखत आहेत. त्यांना गोंधळात अडचणीत टाक.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजीत होवोत; माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे मला ठार करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांची तुम्ही धूळधाण करा; त्यांना मागे फिरवा आणि त्यांना लज्जित करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे माझ्या जीवाच्या शोधात आहेत, ते लाजवले जावो आणि अप्रतिष्ठीत होवोत. जे माझे वाईट योजितात ते मागे फिरले जावोत व गोंधळले जावोत.