Psalms 39:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, तू मला अगदी कमी आयुष्य दिलेस. माझे आयुष्य म्हणजे तुझ्या दृष्टीने काहीच नाही. प्रत्येकाचे आयुष्य केवळ ढगासारखे असते. कुणीही सदासर्वकाळ जगत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, तू माझे दिवस वीतभर केले आहेत; माझ्या आयुष्याचा काळ तुझ्यापुढे काही नाही; एखादा मनुष्य कितीही खंबीर असला तरी तो श्वासरूपच होय, हे खास. (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाहा, तुम्ही माझे दिवस चार बोटे केले आहे; माझा जीवितकाल तुमच्या दृष्टीने केवळ एका क्षणाचाच आहे; प्रत्येकजण, अगदी निश्चिंत असणारे लोकसुद्धा केवळ एक श्वास आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, तू माझे दिवस हाताच्या रुंदी इतके केले आहेत. आणि माझा जीवनकाल तुझ्यासमोर काहीच नाही. खचित मनुष्य केवळ एक श्वासच आहे.