Psalms 4:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या चांगल्या देवा, मी तुझी प्रार्थना करीन तेव्हा मला उत्तर दे माझी प्रार्थना ऐक आणि माझ्याशी दयाळू अंतकरणाने वाग. मला माझ्या संकटांपासून थोडी तरी मुक्ती दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दाविदाचे स्तोत्र. हे माझ्या न्यायदात्या देवा, मी तुझा धावा करतो तेव्हा माझे ऐक; मला तू पेचांतून मोकळे केले आहेस; माझ्यावर कृपा कर, माझी प्रार्थना ऐक.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे माझ्या नीतिमान परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारेन, तेव्हा मला उत्तर द्या. माझ्या संकटात तुम्हीच मला साहाय्य करा. माझ्यावर दया करा, माझी प्रार्थना ऐका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा. संकटात मी असता, तेव्हा तू मला मुक्त केले, माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक.