Psalms 4:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकहो! तुम्ही आणखी किती काळ माझ्याविषयी वाईट बोलत राहाणार आहात? तुम्ही माझ्याबाद्दल सांगण्यासाठी नवीन काहीतरी खोटे नाटे शोधत असता आणि माझ्याविषयी तसले खोटे सांगणे तुम्हाला आवडते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहो मनुष्यांनो, माझ्या गौरवाची अप्रतिष्ठा कोठवर चालणार? तुम्हांला निरर्थक गोष्टी कोठवर आवडणार आणि तुम्ही लबाडीची कास कोठवर धरणार? (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहो मनुष्यांनो, किती वेळा तुम्ही माझ्या गौरवाला काळिमा लावणार? किती काळ तुम्ही फसवणुकीवर प्रीती कराल आणि खोट्या दैवतांचा शोध कराल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार? किती काळ तुम्ही व्यर्थतेची आवड धरणार, आणि खोट्याचा शोध घेणार?