Psalms 40:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, हे समजून घ्यायला तू मला मदत केलीस. तुला बळी किंवा धान्याच्या भेटी नको असतात. होमार्पणे किंवा पापार्पणे तुला नको असतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यज्ञपशू व अन्नार्पण ह्यांत तुला संतोष नाही; तू माझे कान उघडले2 आहेस; होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यज्ञ किंवा अन्नार्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही— परंतु तुम्ही माझे कान उघडले आहेत; होमार्पण आणि पापार्पण यांनी तुम्हाला संतोष होत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यज्ञ आणि अन्नार्पण यांमध्ये तुला आनंद नाही. परंतु तू माझे कान उघडले आहेत. होमार्पणे किंवा पापार्पणे तू मागत नाहीस.