Psalms 41:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही लोक मला भेटायला येतात परंतु त्यांच्या मनात काय आहे ते सांगत नाहीत. ते माझ्याबद्दलची काही बातमी मिळवण्यासाठी येतात. नंतर ते जातात आणि त्यांच्या अफवा पसरवतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्यापैकी कोणी माझ्या समाचारास आला तर तो वरपांगी बोलतो; तो आपल्या मनात कुकल्पना साठवतो; आणि बाहेर जाऊन त्या सांगतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा त्यांच्यापैकी कोणी मला भेटायला येतो, तेव्हा तो पोकळपणा दर्शवितो, तो अंतःकरणात वाईटाचा संग्रह करतो; तो बाहेर जाऊन या गोष्टीचा प्रचार करतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे शत्रू मला पाहायला आले असता ते व्यर्थ शब्द बोलतात. त्यांचे हृदय माझ्यासाठी खोटी साक्ष गोळा करते. जेव्हा ते माझ्यापासून दूर जातात तर दुसऱ्यांना देखील हेच सांगतात.