Psalms 42:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते. त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; कोरहाच्या मुलांचे मस्कील (बोधपर स्तोत्र). हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हरणी जशी पाण्यासाठी उत्कट लालसा करते, तसा हे परमेश्वरा, माझा जीव तुमच्यासाठी उत्कट लालसा करीत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते, तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो.