Psalms 42:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत मी तुझ्या लाटांचा आपटण्याचा आवाज ऐकला. समुद्रातल्या लाटांसारखी संकटे माझ्यावर पुन्हा कोसळली, परमेश्वरा तुझ्या लाटा माझ्यावर चहु बाजूंनी आदळत आहेत. तुझ्या लाटांनी मला पूर्णपणे झाकले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या धबधब्यांच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंढ्याला बोलावत आहे; तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या गर्जणार्‍या धबधब्याप्रमाणे, सागर सागराला आव्हान करतो; तुमच्या सर्व लाटा व त्यांचा कल्लोळ माझ्यावर झपाटून आदळत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या धबधब्याच्या अवाजाने ओघ ओघाला हाक मारतो. तुझ्या सर्व लहरी आणि मोठ्या लाटा माझ्यावरून गेल्या आहेत.