Psalms 44:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी तू त्यांच्या आयुष्यात काय केलेस ते सांगितले, खूप पूर्वी तू काय केलेस तेही त्यांनी सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; कोरहाच्या मुलांचे मस्कील (बोधपर स्तोत्र). हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसांत, पुरातन काळी, तू जे कार्य केलेस त्याचे वर्णन त्यांनी केले, व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, प्राचीन काळी तुम्ही आमच्या पूर्वजांच्या दिवसांत केलेल्या कार्याचे वर्णन त्यांनी आम्हाला सांगितले आणि आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी ते आम्हास सांगितले आहे, की पुरातन दिवसात तू, त्यांच्या दिवसात काय कार्य केलेस.