Psalms 45:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी राजासाठी या गोष्टी लिहितो तेव्हा माझे मन सुंदर शब्दांनी भरुन जाते. एखाद्या कसबी लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जिभेतून शब्द येतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; शोशन्नीम (भूकमले) ह्या चालीवर गायचे कोरहाच्या मुलांचे मस्कील (बोधपर स्तोत्र); प्रेमगीत. माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे; राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे हृदय एका चांगल्या गोष्टीने ओसंडून जात आहे! राजाकरिता लिहिलेली कविता मी म्हणून दाखवितो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी बनली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे हृदय चांगल्या विचारांनी भरून वाहते, राजासाठी बनवलेली काव्ये मी मोठ्याने वाचेन, लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जीभेतून शब्द येतात.