Psalms 49:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते लोक मेंढ्यांप्रमाणे आहेत. थडगे त्यांची लेखणी आहे. मरण त्यांचा मेंढपाळ आहे. एका सकाळी त्यांच्या शरीराचा थडग्यात नाश होईल आणि ते कुजेल तेव्हा चांगले लोक आनंद करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते मेंढरांच्या कळपासारखे अधोलोकासाठी नेमलेले आहेत; मृत्यू त्यांचा मेंढपाळ आहे; प्रभातकाल झाला म्हणजे नीतिमान त्यांच्यावर प्रभुत्व करतील; त्यांचे देह अधोलोकात क्षय पावतील; त्यांना वस्तीला कोठे थारा राहणार नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते आपल्या कबरांमध्ये मेंढरांप्रमाणे पडून राहतात; मृत्यू त्यांचा मेंढपाळ होईल (प्रातःकाळी नीतिमान लोक प्रभुत्व करतील) त्यांचे देह कबरेत उतरतील, कारण त्यांना कोणताच आधार राहिला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते कळपाप्रमाणे नेमलेले आहेत, जे मृतलोकांत जातात. मरण त्यांचा मेंढपाळ आहे. सरळ त्यांच्यावर धनीपण करतील असे सामर्थ्य त्यांना असेल.