Psalms 55:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर शत्रूंनीच माझा अपमान केला तर मी तो सहन करु शकेन. जर शत्रूंनीच माझ्यावर हल्ला केला तर मी लपू शकेन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण ज्याने माझी निंदा केली तो काही माझा वैरी नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; माझ्यापुढे ज्याने तोरा मिरवला तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याने माझी निंदा केली, तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; मी लपून बसलो असतो आणि निसटून गेलो असतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर तर मला कळून आले असते, किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरूद्ध उठला असता, तर मी स्वतःला त्याजपासून लपवले असते.