Psalms 57:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझे जीवन संकटात आहे, माझ्याभोवती माझे शत्रू आहेत. ते माणसे खाणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. त्यांचे दात भाल्याप्रमाणे आणि बाणाप्रमाणे तीक्ष्ण आहेत आणि त्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझा जीव सिंहांमध्ये पडला आहे; ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवारच आहे, अशा जाज्वल्य मनुष्यांमध्येदेखील मी पडून राहीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सिंहांनी मला घेरले आहे; ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवार आहे अशा हिंसक स्वभावाच्या मनुष्यांमध्ये मी पडलो आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझा जीव सिंहाच्यामध्ये पडला आहे; ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, आणि ज्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे अशा लोकांमध्ये मला जबरदस्तीने रहावे लागत आहे.