Psalms 59:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, मला माझ्या शत्रूंपासून वाचव माझ्याशी लढायला जे लोक आले आहेत त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी मला मदत कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; अल्तश्केथ (नष्ट करू नको) ह्या चालीवर गायचे; शौलाने माणसे पाठवून दाविदाला ठार मारण्याकरता त्याच्या घरावर पहारा ठेवला तेव्हा त्याने रचलेले मिक्ताम नावाचे स्तोत्र. हे माझ्या देवा, माझ्या वैर्यांपासून मला सोडव. जे माझ्यावर उठतात त्यांच्यापासून मला वाचव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, मला माझ्या शत्रूपासून सोडवा; जे माझ्याविरुद्ध उठले आहेत, त्यांच्यापासून रक्षण करण्यास माझे दुर्ग व्हा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, मला माझ्या शत्रूंपासून सोडीव; जे माझ्याविरूद्ध उठतात त्यांच्यापासून मला दूर उंचावर ठेव.