Psalms 59:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बघ, ते बलवान लोक माझी वाट पहात आहेत. ते मला मारण्यासाठी थांबले आहेत. परंतु मी पाप केले नाही किंवा कुठला गुन्हा केला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, ते माझा जीव घ्यायला टपले आहेत; हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा दोष नसता दांडगे लोक माझ्याविरुद्ध एकत्र जमले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाहा, माझा जीव घेण्यासाठी ते कसा दबा धरून बसले आहेत! याहवेह, मी कोणताही अपराध किंवा पाप केले नसता क्रूर माणसे माझ्याविरुद्ध कट रचत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण, पाहा, ते माझ्या जीवासाठी दबा धरून बसले आहेत. हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा पातक नसता, सामर्थी लोक माझ्याविरूद्ध एकत्र गोळा झाले आहेत.