Psalms 60:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, तू आमच्यावर रागावला होतास म्हणून तू आमचा त्याग केलास आणि आमचा नाश केलास. कृपाकरुन आमच्याकडे परत ये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; शूशन एदूथ (साक्षीचे भूकमल) ह्या चालीवर शिक्षणासाठी गायचे मिक्ताम नावाचे दाविदाचे स्तोत्र. तो अराम-नहराईम व अराम-सोबा ह्यांच्याशी लढाई करीत असता यवाबाने परत जाऊन क्षाराच्या खोर्‍यात अदोमातले बारा हजार पुरुष मारले तेव्हा रचलेले. हे देवा, तू आमचा त्याग केला आहेस, आमची दाणादाण केली आहेस; तू कोपायमान झाला आहेस; तू आम्हांला पूर्वस्थितीवर आण.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, तुम्ही आमचा त्याग केला, आम्हाला फोडून टाकले आहे; तुम्ही आमच्यावर कोपला आहात—आता आम्हाला पूर्वस्थितीवर आणा!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, तू आम्हास टाकून दिले आहेस; तू आम्हास फाडून खाली टाकले आहे; आमच्यावर रागावला आहेस; तू आम्हांस पुन्हा पूर्वस्थितीवर आण.