Psalms 60:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव त्याच्या मंदिरात म्हणाला मी युध्द जिंकेन आणि विजयामुळे आनंदी होईन. मी ही जमीन माझ्या लोकांबरोबर वाटून घेईन. मी त्यांना शखेम आणि सुक्ाथाचेे खोरे देईन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव आपल्या पवित्रतेला अनुसरून1 म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन व सुक्कोथाचे खोरे मोजून देईन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराने त्यांच्या पवित्रस्थानी घोषणा केली: “मी विजयाने शेखेमचे विभाजन करेन, आणि सुक्कोथाचे खोरे मोजून त्याचे इतरांना वाटप करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी जल्लोष करीन; मी शखेमाची वाटणी करीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.