Psalms 63:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, तू माझा देव आहेस आणि तू मला खूप हवा आहेस. माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क, बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाच्या रानात असताना रचलेले दाविदाचे स्तोत्र. हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, तुम्ही माझे परमेश्वर आहात, मी तुमचा कळकळीने शोध करतो; या कोरड्या आणि वैराण भूमीत माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला झाला आहे; माझे सर्वस्व तुमच्यासाठी किती उत्कंठित झाले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन; शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे; माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे.