Psalms 64:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वाईट करण्यासाठी ते एकमेकांना प्रोत्साहन देतात व सापळे रचण्याबाबत चर्चा करतात. “आपले सापळे कोणीही बघणार नाही” असे ते एकमेकांना सांगतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते आपला दुष्ट संकल्प दृढ करतात; पाश गुप्तपणे मांडण्याविषयी ते कुजबुज करतात; “आम्हांला कोण पाहणार?” असे ते म्हणतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुष्कृत्य करण्यास ते एकमेकांना प्रोत्साहन देतात; सापळे आखण्यासाठी ते गुप्तपणे एकत्र जमतात; ते म्हणतात, “ते कोण पाहणार?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते आपणाला वाईट योजनेत उत्त्तेजन देतात; ते खाजगीत एकत्रित येऊन सापळा रचण्याचा सल्लामसलत करतात; ते म्हणतात, आपल्याला कोण पाहील?