Psalms 65:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू नांगरलेल्या जमिनीवर पाऊस पाडतोस. तू शेतजमीन पाण्याने भिजवतोस. तू जमीन पावसाने भुसभुशीत करतोस. आणि तू त्यावर छोट्या रोपट्यांना उगवू देतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस; तिचे उंचवटे सपाट करतोस; तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस; तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही नांगरलेल्या सऱ्यांना पाणी देता आणि तुम्ही तिचे उंचवटे सपाट करता; पावसाच्या सरींनी तिला मऊ करता; तिच्या अंकुरांना आशीर्वाद देता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस; तू तिचे उंचवटे सपाट करतोस; तू तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. तिच्यात अंकुरीत झालेले आशीर्वादित करतोस