Psalms 65:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, तू तुझ्या लोकांची निवड केलीस. आम्ही तुझ्या मंदिरात येऊन तुझी प्रार्थना करावी यासाठी तू आमची निवड केलीस आणि आम्ही खूप आनंदी आहोत. तुझ्या मंदिरातल्या आणि तुझ्या पवित्र राजवाड्यातल्या सगळ्या सुंदर विस्मयकारक गोष्टी आमच्या जवळ आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या अंगणांत राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य; तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्रस्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या अंगणात येऊन राहण्यासाठी तुम्ही ज्यांची निवड केली, ते धन्य! आम्ही तुमच्या मंदिरातील पवित्रस्थानाच्या उत्कृष्ट पदार्थांनी संतुष्ट होऊ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे, याकरिता की; त्याने तुझ्या अंगणात रहावे. तुझ्या घराच्या, तुझ्या मंदिराच्या उत्तम पदार्थांनी आम्ही तृप्त होऊ.