Psalms 68:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाशान, तू सियोन पर्वताकडे तुच्छेतेने का पाहतोस? देवाला तो पर्वत (सियोन) आवडतो. परमेश्वराने कायमचे तिथेच राहाणे पसंत केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाला निवासासाठी जो पर्वत आवडला, त्याच्याकडे, हे अनेक शिखरांच्या पर्वता, तू वक्रदृष्टीने का पाहतोस? त्याच्यावरच परमेश्वर खरोखर सदोदित राहील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या सर्वकाळच्या निवासासाठी परमेश्वराने ज्याची निवड केली, त्या सीयोन पर्वताकडे तू हेव्याने का पाहतोस? याहवेहनी ते निवास करण्यासाठी निवडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाला आपल्या निवासासाठी जो पर्वत आवडला आहे, त्याच्याकडे हे अनेक शिखरांच्या पर्वता, तू हेव्याने का पाहतोस? खरोखर, परमेश्वर त्याच्यावरच सर्वकाळ राहील.