Psalms 68:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो उंच पर्वतावर गेला, त्याने कैद्यांची पलटण बरोबर नेली. त्याने माणसांकडून जे त्याच्या विरुध्द होते, त्यांच्याकडूनही नजराणे घेतले. परमेश्वर, देव तेथे राहाण्यासाठी गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू उच्च स्थानी आरोहण केले आहेस; तू पाडाव केलेल्यांना कैद करून नेले आहेस; मनुष्यांमध्ये, बंडखोरांमध्येही तुला नजराणे मिळाले आहेत, ह्यासाठी की, हे परमेशा, देवा, तू तेथे वास करावास.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा तुम्ही उच्चस्थानी आरोहण करता, तुम्ही अनेक बंदिवान नेले; मनुष्यासाठी तुम्ही नजराणे स्वीकारता; अगदी एकेकाळच्या बंडखोरांपासून सुद्धा— जेणेकरून येथे याहवेह परमेश्वर आमच्यामध्ये वस्ती करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू उंचावर चढलास; तू बंदिवानास दूर नेले आहे; मनुष्याकडून आणि जे तुझ्याविरूद्ध लढले त्यांच्यापासूनही भेटी स्वीकारल्या आहेत, यासाठी की, हे परमेश्वर देवा, तू तेथे रहावे.