Psalms 68:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या “प्राण्यानी” तुला हवे ते करावे म्हणून तू तुझ्या काठीचा उपयोग करत्या देशातील “बैलांना” आणि “गायींना” तुझ्या आज्ञेचे पालन करायला लाव. तू त्या देशांचा युध्दात पराभव केला आहेस आता त्यांना तुझ्यासाठी चांदी आणायला सांग.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लव्हाळ्यामध्ये राहणारे वनपशू, बैलांचा कळप आणि त्यांचे वत्स ह्यांना धमकाव; रुप्याचा लोभ धरणार्या लोकांना पायाखाली तुडव. युद्धप्रिय लोकांची त्याने दाणादाण केली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, लव्हाळ्यात राहणार्या वनपशूंना, बैलांचा कळप आणि त्यांच्यासोबत त्यांच्या वासरांना धमकावा; खंडणीची तीव्र इच्छा बाळगणार्यांना पायाखाली तुडवा, आणि युद्धात आनंद मानणार्या राष्ट्रांची दाणादाण करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लव्हाळ्यात राहणारे वनपशू, बैलांचा कळप आणि त्यांचे वासरे ह्यांना धमकाव. जे खंडणीची मागणी करतात त्यांना आपल्या पायाखाली तुडव; जे लढाईची आवड धरतात त्यांना विखरून टाक.