Psalms 68:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवासाठी गाणे म्हणा त्याच्या नावाचे गुणगान करा, देवासाठी रस्ता तयार करा. तो त्याच्या रथात बसून वाळवंटातून जातो त्याचे नाव यादे आहे. त्याच्या नावाची स्तुती करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाला गीत गा, त्याच्या नावाचे स्तवन करा; ज्याची स्वारी ओसाड प्रदेशातून चालली आहे, त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा; त्याचे नाव परमेश आहे, त्याच्यापुढे आनंदोत्सव करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या नावाचे स्तवन करा, जे मेघांवर स्वार होतात, त्यांची महिमा करा; त्यांचे नाव याहवेह आहे—त्यांच्या समक्षतेत हर्ष करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा; ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा; त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा.