Psalms 69:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इथे उभे राहाण्यासाठीही काही नाही. मी बुडत चाललो आहे. चिखलात बुडत आहे. मी खोल पाण्यात आहे आणि लाटा माझ्यावर येऊन आदळत आहेत. मी आता लवकरच बुडणार आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी खोल दलदलीत रुतलो आहे, तेथे उभे राहण्यास आधार नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, आणि लोंढा माझ्यावरून जात आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दलदलीत मी खोल रुतत चाललो आहे; मला माझ्या पायावर उभे राहता येत नाही. मी खोल दलदलीत आलो आहे; माझ्या सभोवती पाणी वाढत चालले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, तेथे पुराचे पाणी माझ्यावरून वाहत आहे.