Psalms 71:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझी जीभ नेहमी तुझ्या चांगुलपणाची गाणी गाईल आणि ज्या लोकांना मला ठार मारायची इच्छा होती त्यांचा पराभव होईल आणि ते कलंकित होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझी जीभही दिवसभर तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील; कारण माझे वाईट करू पाहणारे लज्जित व फजीत झाले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या न्यायीपणाचे वर्णन माझी जीभ दिवसभर करेल, कारण मला अपाय करण्याची योजना करणारे सर्व लज्जित आणि अपमानित झाले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझी जीभदेखील दिवसभर तुझ्या नितिमत्वाविषयी बोलेल; कारण ज्यांनी मला इजा करण्याचा प्रयत्न केला ते लज्जित झाले आहेत, आणि गोंधळून गेले आहेत.