Psalms 74:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू खूप दिवसांपूर्वी ज्या लोकांना विकत घेतलेस त्यांची आठवण ठेव. तू आम्हाला वाचवलेस आता आम्ही तुझे आहोत. ज्या सियोनाच्या डोंगरावर तू राहिलास त्याची आठवण तुला होते का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जी मंडळी पुरातन काळी तू विकत घेतलीस, जिला तू आपले वारस होण्याकरता खंडणी भरून सोडवलेस तिचे, व ज्या सीयोन पर्वतावर तू वस्ती केली त्याचे स्मरण कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे राष्ट्र प्राचीन काळी मोलाने विकत घेतले, ज्यांना आपले वारस होण्याकरिता तुम्ही खंडणी भरून सोडविले— सीयोन पर्वत जे तुमचे वसतिस्थान, त्यांचे स्मरण करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू प्राचीनकाळी जी मंडळी विकत घेतली, जिला तू आपले वारस होण्याकरता खंडणी भरून सोडविले तिचे, व ज्या सीयोन पर्वतावर तू वस्ती केली त्याची आठवण कर.