Psalms 78:55 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने इतर देशांना ती जमीन सोडून जायला भाग पाडले. देवाने प्रत्येक कुटुंबाला जमिनीचा त्यांचा हिस्सा दिला. देवाने इस्राएलाच्या प्रत्येक कुटुंबाला राहायला स्व:तचे घर दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रे हाकून लावली, त्यांच्या राहण्याच्या जागा सूत्राने मापून त्यांना वतन म्हणून वाटून दिल्या, आणि त्यांच्या तंबूंत इस्राएलाचे वंश वसवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी राष्ट्रांना त्यांच्या समोरून काढून टाकले आणि त्यांची जमीन त्यांना सूत्राने मापून वतन म्हणून दिली; त्यांनी इस्राएलाच्या गोत्रास त्यांच्या घरात स्थायिक केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रांना हाकलून लावली, आणि त्यांना त्यांची वतने सूत्राने मापून नेमून दिली; आणि त्यांच्या तंबूत इस्राएलाचे वंश वसविले.