Psalms 79:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इतर देशांना “कुठे आहे तुमचा देव? तो तुम्हाला मदत करु शकत नाही का?” असे म्हणू देऊ नकोस. देवा, त्या लोकांना शिक्षा कर म्हणजे आम्ही ते बघू शकू. तुझ्या सेवकांना मारल्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“ह्यांचा देव कोठे आहे,” असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचा रक्तपात झाला त्याबद्दल सूड उगवण्यात आला आहे, हे आमच्यादेखत राष्ट्रांना कळू दे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इतर राष्ट्रांनी का म्हणावे, “यांचा देव कुठे आहे?” आमच्या डोळ्यादेखत या राष्ट्रांना प्रगट करा, की तुमच्या लोकांच्या या भीषण कत्तलीचा तुम्ही सूड घेता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ह्यांचा देव कोठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचे जे रक्त पाडले गेले, त्याबद्दलचा सूड उगविण्यात आला आहे हे आमच्या देखत राष्ट्रांमध्ये कळावे.