Psalms 84:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना आणि पाकोळ्यांना देखील घरे असतात. ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात आणि तिथे त्यांना पिल्ले होतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करण्यास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधण्यास स्थळ मिळाले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे सर्वशक्तिमान याहवेह, माझ्या राजा आणि माझ्या देवा, तुमच्या वेद्यांजवळ चिमणीला घरटी बांधण्याचे, व निळवीला देखील आपली पिल्ले ठेवण्याचे ठिकाण सापडले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला आपले घर आणि निळवीला आपली पिल्ले ठेवण्यासाठी कोटे सापडले आहे.