Psalms 90:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आम्ही कदाचित् 70 वर्षे जगू आणि जरा सशक्त असलो तर 80 वर्षे. आमचे आयुष्य कठोर परिश्रम आणि दु:ख यांनी भरलेले आहे आणि नंतर आमचे आयुष्य अवचित् संपते आणि आम्ही उडून जातो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्हाला सत्तर वर्षाचे आयुष्य दिले आहे; आणि सशक्त असल्यास ऐंशी वर्षे; परंतु यातील उत्तम वर्षेदेखील पुष्कळदा त्रास आणि दुःखे यांनीच भरलेली असतात; लवकरच ती सरतात आणि आम्ही निघून जातो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आमचे आयुष्य सत्तर वर्षे आहे; किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे; पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु:ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो.