Psalms 99:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस, तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस; तू त्यांना क्षमा करणारा असा देव होतास, तरी त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांना शासन करीत होतास.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह, आमच्या परमेश्वरा, तुम्ही त्यांना उत्तर दिले; त्यांच्या दुष्कृत्यांची त्यांना शिक्षा केली, तरी इस्राएलसाठी तुम्ही क्षमाशील परमेश्वर होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस. तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास.