Revelation 1:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी कोणाला तरी दीपस्तंभामध्ये पाहिले जो “मनुष्याच्या पुत्रासारखा” होता. त्याने लांब पायघोळ झगा घातला होता. त्याने सोन्याचा पट्टा छातीवर बांधला होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ झगा परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्या समयांच्या मध्यभागी ‘मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ वस्त्र परिधान केलेला,’ आणि छातीवरून ‘सोन्याचा’ ‘पट्टा बांधलेला’ असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या समयांच्या मध्यभागी मानवपुत्रासारखा दिसणारा कोणी एक उभा होता. त्यांनी पायघोळ वस्त्र घातले होते व छातीवर सोन्याचा पट्टा बांधला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा व लांब पायघोळ झगा घातलेला, छातीवर सोन्याचा पट्टा बांधलेला, असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला.