Revelation 1:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जी व्यक्ती देवाकडून आलेल्या या संदेशाचे शब्द उघडपणे वाचते ती धन्य आहे. आणि जे लोक हा संदेश ऐकतात आणि त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत. कारण आता जास्त वेळ उरला नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य आहेत कारण ह्या गोष्टी घडण्याची वेळ जवळ आली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य; कारण समय जवळ आला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो कोणी या भविष्यकथनाचे मोठ्याने वाचन करतो तो धन्य, जे लोक ते ऐकतात आणि यात लिहिल्याप्रमाणे पालन करतात ते धन्य, कारण वेळ जवळ आली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या संदेशाची वचने वाचणारे, ती ऐकणारे व त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत कारण काळ जवळ आला आहे.