Revelation 1:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी योहान आहे, आणि मी तुमचा बंधु आहे. आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत आणि आपण या गोष्टींमध्ये वाटेकरी आहोत. दु:खसहनात, राज्यात, धीराने सहन करण्यात, येशूच्या सत्यात आणि देवाच्या संदेशात मी विश्वासू होतो त्यामुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
देवराज्याचे नागरिक म्हणून तुम्ही जो छळ धीराने सहन करीत आहात, त्या छळात मी, तुमचा बंधू योहान, येशूचा अनुयायी म्हणून सहभागी आहे. देवाचा शब्द व येशूने प्रकट केलेले सत्य जाहीर केल्याबद्दल मला पात्म बेटावर ठेवण्यात आले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर ह्यांचा तुमच्याबरोबर भागीदार आहे, तो मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्यांकरता पात्म नावाच्या बेटात होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी योहान, तुमचा बंधू, येशूंच्या दुःखात, राज्यात व धीरात तुमचा सहभागी असलेला, परमेश्वराच्या वचनामुळे आणि येशूंच्या साक्षीमुळे पत्मोस नावाच्या बेटावर शिक्षा भोगीत होतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व सहनशीलता ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे, तो मी देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.