Revelation 10:1 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग मी आणखी एक शक्तीशाली देवदूत स्वर्गातून येताना पाहिला. तो ढगांनी आच्छादलेला होता. त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचा चेहरा सूर्यासारखा होता, त्याचे पाय जणू काय अग्नीचे खांब होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी आणखी एक सामर्थ्यशाली देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघवेष्टित होता व त्याच्या डोक्याभोवती मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला; तो मेघवेष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे, व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मी आणखी एक पराक्रमी देवदूत, स्वर्गातून उतरतांना पाहिला. त्याने मेघांचे वेष्टण घातले होते. त्याच्या मस्तकाच्या वरती मेघधनुष्य होते; त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी होता आणि त्याचे पाय अग्नी स्तंभासारखे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरतांना पाहिला; तो मेघ पांघरलेला असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे, पाय अग्निस्तंभासारखे होते,