Revelation 10:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जो अनंतकाळ जगतो, ज्याने आकाश व त्यातील सर्व काही बनविले, पृथ्वी व तीवरील, त्याच्या नावाने शपथ वाहिली. आणि म्हणाला, “आता आणाखी विलंब होणार नाही!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि जो युगानुयुगे जिंवत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे, भूमी व तिच्यावर जे आहे आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले, “आणखी वेळ लागणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते, आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले’, आणखी अवकाश लागणार नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जे युगानुयुग जिवंत आहे, ज्यांनी आकाश व त्यातील सर्वकाही, पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही, समुद्र व त्यातील सर्व जलचर निर्माण केले, त्यांची शपथ वाहून म्हटले, “आता अधिक विलंब लागणार नाही!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यामध्ये जे आहेत, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते आणि समुद्र व त्यामध्ये जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटलेः आणखी उशीर होणार नाही;