Revelation 10:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून मी त्या देवदूताकडे गेलो व मला ती लहान गुंडाळी दे असे म्हणालो. तो मला म्हणला, “ही घे, आणि ही खा. ती खाल्ल्याने तुझे पोट कडू होईल. पण तुझ्या तोंडाला मात्र ते मधासारखे गोड लागेल.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन “ती लहानशी गुंडाळी मला दे”, असे म्हटले. तो मला म्हणाला, “ही घे आणि खाऊन टाक. ती तुझे पोट बिघडवेल परंतु तुझ्या तोंडाला मधासारखी गोड लागेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, ‘ते लहानसे पुस्तक’ मला दे असे म्हटले. तो मला म्हणाला, “हे घे ‘आणि खाऊन टाक’; ‘ते तुझे पोट कडू’ करील, तरी ‘तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याप्रमाणे त्याच्याकडे जाऊन मी त्याला ती छोटी गुंडाळी मागितली. तो मला म्हणाला, “ही घे आणि खाऊन टाक. ‘ती तुझ्या तोंडात मधासारखी गोड लागेल,’ पण ती गिळल्यावर ती तुझे पोट आंबट करेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, “ती लहान गुंडाळी” मला दे असे म्हटले. तो म्हणाला, “हि घे आणि खाऊन टाक; ती तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.”