Revelation 11:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग मला मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येण्यासारखी काठी देण्यात आली. आणि मला सांगण्यात आले, “जा आणि देवाचे मंदिर, वेदी व तेथील उपासकांचे मोजमाप कर.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर काठीसारखी एक मोजपट्टी मला देण्यात आली व सांगण्यात आले, “जा, देवाचे मंदिर, वेदी ह्यांचे माप घे आणि तिथे उपासना करणाऱ्यांची गणती कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर काठीसारखा एक ‘बोरू’ कोणीएकाने मला दिला, आणि म्हटले: “ऊठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक ह्यांचे माप घे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मला एक मापनपट्टी देण्यात आली आणि मला सांगण्यात आले, “जा परमेश्वराच्या मंदिराचे आणि वेदीचे मोजमाप उपासकांसहित घे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मला मोजमाप करण्यासाठी काठीसारखा बोरू देण्यात आला आणि मला सांगण्यात आले, “ऊठ आणि देवाचे भवन, वेदी आणि त्यामध्ये जे उपासना करतात त्यांचे मोजमाप घे.