Revelation 11:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते म्हणाले: “आम्ही तुझे आभार मानतो. सर्वसमर्थ प्रभु देवा, तूच एक आहेस की जो तू आहेस व होतास. आम्ही तुझे उपकार मानतो कारण तुझे महान सामर्थ्य वापरुन सत्ता चालविण्यास सुरुवात केलीस
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तू आहेस व होतास, तू आपले महान सामर्थ्य धारण केले आहे आणि अधिकार हाती घेतला आहे म्हणून आम्ही तुझे आभार मानतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था; जो तू आहेस व होतास [व येणार], तो तू, आपले महान सामर्थ्य धारण केले आहेस आणि ‘राज्यारूढ झाला आहेस’ म्हणून आम्ही तुझे आभार मानतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते म्हणाले: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. जे आहेत आणि जे होते, कारण तुम्ही आपले महान सामर्थ्य प्रकट करून तुमच्या शासनाची सुरुवात केली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, जो तू आहेस आणि होतास, त्या तुझे आम्ही उपकार मानतो, कारण तुझे महान सामर्थ्य तू आपल्याकडे घेतले आहेस आणि राज्य चालविण्यास सुरूवात केलीस.