Revelation 12:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग सापासमोरुन तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या ठिकाणी उडून जाता यावे म्हणून त्या स्त्रीला मोठ्या गरुडाचे पंख देण्यात आले होते. मग त्या ठिकाणी साडेतीन वर्षेपर्यंत तिचे पोषण केले जाते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले होते. तेथे अजगराच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहत असताना साडे तीन वर्षे तिचे पोषण केले जाणार होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले होते; तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक ‘काळ, दोन काळ व अर्धकाळ’ तिचे पोषण व्हायचे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या जागी तिने उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाच्या पंखांसारखे दोन पंख देण्यात आले. तिथे तिचे साडेतीन वर्षे पोषण व त्या अजगरापासून रक्षण व्हावयाचे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु स्त्रीने सापाच्या पुढून तिच्या रानातल्या ठिकाणी उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले; आणि तेथे ती सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक काळ, दोन काळ आणि अर्धकाळ तिचे पोषण केले जाईल.