Revelation 12:16 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण पृथ्वीने तिला मदत केली. पृथ्वीने तिचे तोंड उघडले व त्या प्रचंड सापाच्या तोंडातून आलेली नदी तिने गिळून टाकली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले, तिने तोंड उघडून अजगराने त्याच्या तोंडातून सोडलेले पाणी गिळून टाकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले; तिने ‘आपले तोंड उघडून’ अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी ‘गिळून टाकली.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण तेवढ्यात पृथ्वीने आपले तोंड उघडले आणि तो महापूर गिळून घेऊन अजगरापासून त्या स्त्रीचा बचाव केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण भूमीने स्त्रीला मदत केली; आणि अजगराने तोंडातून सोडलेली नदी भूमीने तोंड उघडून गिळून घेतली.