Revelation 12:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला. तो मुलगा लोखंडी दंडाने सर्व राष्ट्रांवर सत्ता चालविणार होता. तिच्या मुलाला देवाकडे व त्याच्या सिंहासनाकडे नेण्यात आले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र ती प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे हिसकावून नेण्यात आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व ‘राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील’ असा पुत्र म्हणजे पुंसंतान ती प्रसवली; ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या स्त्रीने एका अशा मुलाला जन्म दिला, “की जो सर्व राष्ट्रांवर लोह-राजदंडाने राज्य करणार होता.” त्या मुलाला परमेश्वरापुढे व राजासनापुढे उचलून नेण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवील अशा मुलास म्हणजे पुसंतानास तिने जन्म दिला; त्या मुलाला देवाकडे व त्याच्या राजासनाकडे उचलून नेण्यात आले.