Revelation 12:6 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो स्त्री देवाने तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या ठिकाणाकडे पळून गेली. तेथे त्या स्त्रीची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात येईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ती स्त्री रानात पळून गेली. त्या ठिकाणी तिचे एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेली तिची एक जागा होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती स्त्री रानात पळून गेली; तेथे तिचे एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती स्त्री अरण्यात पळून गेली. तिथे तिचे 1,260 दिवस पोषण करण्याकरिता परमेश्वराने तिच्यासाठी एक जागा तयार करून ठेवली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ती स्त्री रानात पळाली; तेथे तिची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात यावी म्हणून तिच्यासाठी देवाने तयार केलेले ठिकाण आहे.