Revelation 12:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सापला आकाशातून खाली फेकण्यात आले. तो प्रचंड साप, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला चकवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो अवाढव्य अजगर खाली फेकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला तो प्राचीन साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांनाही टाकण्यात आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल1 व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो प्रचंड अजगर, म्हणजे दियाबल किंवा सैतान म्हटलेला, सर्व जगाला फसविणारा प्राचीन सर्प, याला त्याच्या सर्व दूतांसह पृथ्वीवर लोटून देण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.