Revelation 13:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हा प्राणी पहिल्या प्राण्यासमोर उभा राहतो व पहिल्या प्राण्याकडे जी शक्ति होती तीच तो वापरतो. पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांनी पहिल्या प्राण्याची उपासना करावी यासाठी तो आपली शक्ति वापरतो. पहिला प्राणी असा होता की त्याला प्राणघातक अशी जखम होती जी बरी झाली होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालविते आणि ज्या पहिल्या श्वापदाची प्राणघातक जखम बरी झाली होती, त्याची पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी आराधना करावी, असे ते दडपण आणते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्यासमक्ष चालवते आणि ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता, त्याला पृथ्वीने व तिच्यावर राहणार्या लोकांनी नमन करावे असे करते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्राणघातक जखम बरी झालेल्या त्या पहिल्या पशूच्या प्रतिनिधी सारखा सर्व अधिकार त्याने चालविला व सर्व जगास त्या पहिल्या पशूला नमन करविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो पहिल्या पशूची सर्व सत्ता त्याच्यासमक्ष स्वतः चालवतो; ज्या पहिल्या पशूची जीवघेणी जखम बरी झाली होती त्यास पृथ्वीने व तीवर राहणाऱ्यांनी नमन करावे असे तो करतो.