Revelation 13:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या प्राण्याला पहिल्या प्राण्याच्या मूर्तीला जीवन देण्यासाठी शक्ति देण्यात आली. मग ती मूर्ती बोलेल व जे लोक तिची भक्ति करीत नाहीत त्यांना ठार मारण्याची आज्ञा देईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पहिल्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली होती, ह्यासाठी की, श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीची आराधना करणार नाहीत ते ठार मारले जावेत, असे तिने घडवून आणावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली; ह्यासाठी की, श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि ‘जे कोणी’ त्या श्वापदाच्या ‘मूर्तीला नमन करणार नाहीत’ ते जिवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या पहिल्या पशूच्या मूर्तीमध्ये प्राण घालून तिला बोलण्याची शक्ती देण्याचीही दुसर्या पशूला परवानगी देण्यात आली होती. मग खुद्द त्या मूर्तीनेच हुकूम सोडला: “जो कोणी त्या पशूच्या मूर्तीला नमन करण्याचे नाकारील, त्याला ठार मारले जाईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसऱ्या पशूला, पहिल्या पशूच्या मूर्तीला जीवन देण्याची परवानगी होती. म्हणजे त्या पशूच्या मूर्तीने बोलावे आणि असे करावे की, जितके लोक त्या पशूच्या मूर्तीला नमन करणार नाहीत तितक्यांना जिवे मारले जावे.