Revelation 13:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यासाठी की, चिन्ह असल्याशिवाय कोणीही व्यक्तीने विकू नये किंवा विकत घेऊ नये. हे चिन्ह म्हणजे त्या प्राण्याचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि ज्याच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, त्याच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे दडपण त्याने सर्व लोकांवर आणले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ज्यांच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे ते श्वापद करते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या पहिल्या पशूची खूण किंवा त्याच्या नावाचा सांकेतिक आकडा त्यांच्यावर असल्याशिवाय कोणालाही विकत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ती खूण म्हणजे त्या पशूचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे, त्याच्यावाचून इतर कोणाला काही विकत घेता येऊ नये किंवा विकता येऊ नये.