Revelation 13:2 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हा पशू चित्त्यासारखा दिसत होता. त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते. त्याला सिंहाच्या तोंडासारखे तोंड होते. त्या प्रचंड सापाने त्या प्राण्याला त्याची शक्ति, त्याचे शिंहासन आणि मोठा अधिकार दिला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जे श्वापद मी पाहिले, ते चित्त्यासारखे होते, त्याचे पाय अस्वलाच्या पायांसारखे व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व विपुल अधिकार दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे ‘श्वापद’ मी पाहिले ते ‘चित्त्यासारखे’ होते, त्याचे पाय ‘अस्वलाच्या’ पायांसारखे होते व त्याचे तोंड ‘सिंहाच्या’ तोंडासारखे होते; त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा पशू दिसावयास चित्त्यासारखा होता, पण त्याचे पाय अस्वलासारखे व तोंड सिंहासारखे होते. अजगराने त्याला स्वतःचे सामर्थ्य, आसन व मोठा अधिकार दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मी पाहिलेला पशू तो चित्त्यासारखा होता, त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते; त्यास अजगराने आपली शक्ती आणि राजासन दिले आणि मोठा अधिकार दिला.